गुंतवणूकीच्या
दृष्टीकोनातून भारत ही जगातील सर्वोत्तम बाजारपेठ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘अर्न्स्ट अॅन्ड यंग’ या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही बाब समोर
आली आहे. जगातील ३२ टक्के गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी भारताला आपली पहिली पसंती
दर्शवली आहे.
![]() |
पुढील तीन वर्षांत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम बाजारपेठ कोणती असेल ? |
या ३२ टक्के गुंतवणूकदारांव्यातिरिक्त ६० टक्के गुंतवणूकदारांनी आपल्या पसंतीच्या पहिल्या तीन देशांत भारताला स्थान दिले आहे. या यादीत चीन अनुक्रमे १५% आणि ४७% सह दुसर्या क्रमांकावर आहे, तर दक्षिण-पूर्व आशिया १२% आणि ३८% सह तिसर्या क्रमांकावर आहे. भारतात होत असलेल्या आर्थिक सुधारणांमुळे गुंतवणुकदारांच्या विश्वासात मोठी वाढ झालेली आहे. तसेच कामगारांवरील कमी खर्च, प्रचंड मोठी बाजारपेठ आणि देशाची वाढणारी पत ही काही प्रमुख कारणे आहेत
No comments:
Post a Comment